10 Nuclear Power Plant Approved :उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा हरियाणातील दीडशे किलाेमीटर उत्तरेस असलेल्या फतेहाबाद जिल्ह्यातील गाेरखपूर गावात उभारला जाणार असल्याची घाेषणा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या राजवटीत देशाच्या ग्रामीण भागात अणू आणि अणुऊर्जा प्रकल्प उभे राहत आहेत, याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रियाही जितेंद्र सिंह यांनी दिली. अणुऊर्जा प्रकल्प हे दक्षिण भारतीय राज्य, तामिळनाडू, आंध्रप्रदेश किंवा पश्चिमेकडील महाराष्ट्रपर्यंत आहेत. परंतु पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली दहा अणुभट्ट्यांच्या स्थापनेसाठी मंजुरी मिळाली आहे. हा क्रांतिकारी निर्णय आहे, असेही जितेंद्र सिंह म्हणाले. अणुऊर्जासाठी २० हजार ५९४ काेटी रुपयांच्या एकूण वाटप केलेल्या रकमेपैकी ४ हजार ९०६ काेटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आला आहे. यातून आर्थिक प्रगती पाहिल्यास २३.८ टक्के इतकी आहे. फायर वाॅटर पंप हाऊस, सेफ्टी रिलेटेड पंप हाऊस, इंधन तेल स्टाेरेज एरिया, व्हेंटिलेशन स्टॅक, आेव्हरहेड टॅंक, स्वीचयार्ड कंट्राेल बिल्डिंग आणि मुख्य प्लांट इमारती किंवा संरचनांचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
