आफ्रिकेतील देश माेरक्काेमध्ये शुक्रवारी रात्री उशिराने आलेल्या भूकंपामध्ये 1 हजार 37 जणांचा मृत्यू झाला आहे. माेरक्काेमधील गेल्या सहा दशकांमधील सर्वात भीषण भूंकप अशी नाेंद झाली आहे. राॅयटर्सच्या वृत्तानुसार माेरक्काेमधील शेकडाे इमारती जमीनदाेस्त झाल्या आहेत. या विनाशकारी भूकंपात जागतिक वारसा स्थळांचे माेठे नुकसान झाले आहे.
माेरक्काेमधील भूकंपात 700 च्यावर जखमी झाले आहेत. माेरक्काेच्या गृहमंत्रालयाने या विनाशकारी भूकंपमधील जीवितहानीची माहितीशी पुष्टी करण्यास सुरूवात केली आहे. माेरक्काेच्या सरकारच्या माहितीनुसार या भूकंपात 1 हजार 37 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढू देखील शकताे. पर्वतीय भागात अधिक मृत्यू असून, बचावकार्य सुरू आहे. या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी हाेती.
माेरक्काेतील माराकेश या जुन्या शहरातील यूनेस्काेचं जागतिक वारसा स्थळ जेमा अल फना स्कायर मशिदीची एकमिनार पडली आहे. तसेच जुन्या इमारती देखील जमीनदाेस्त झाल्या आहेत. माेरक्काेमध्ये यापूर्वी 1960 मध्ये भीषण भूकंप झाला हाेता. त्या भूकंपामध्ये तब्बत 12 हजार जणांचा मृत्यू झाला हाेता. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी माेरक्काेतील घटनेविषयी शाेक व्यक्त केला आहे. भारत माेरक्काेला जी लागेत ती मदत करण्यासाठी तयार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी म्हटले आहे. माेरक्काेला मदतीसाठी जगभरातून प्रमुख देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिका, चीन, इंग्लंड, भारतासह विविध देशांनी मोरक्कोला या संकटातून सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.