राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथील सप्तशृंगी माता मंदिरात सशुल्क दर्शन घेता येणार आहे. विश्वस्त मंडळाने याबाबत घेतला. प्रती व्यक्ती शंभर रुपयाचा पास घेऊन व्हीआयपी दर्शन घेता येणार आहे. साडेती शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून सप्तश्रृंगी गड आहे. हा गड सह्याद्री पर्वत रांगेतील पठार भागात आहे. या गडावर सप्तश्रृंगी मातेचं मंदिर आहे. एक आख्यायिका या मंदिराविषयी आहे. या गडावर भाविक मातेच्या दर्शनाबराेबरच पर्यावरण, निसर्गप्रेमी देखील येतात. समुद्र सपाटीपासून हा गड सुमारे 4600 फूट उंचीवर आहे. नवरात्राेत्सवाच्या काळात या गडावर भाविकांची रेलचेल असते. राज्यभरातून भाविका आपल्या नवसपूर्तीसाठी येतात. गडावर भाविकांच्या आणि पर्यटनप्रेमींसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यानं गर्दीत दिवसेंदिवस वाढ हाेत आहे.
यातून देवी दर्शनासाठी देखील गर्दी वाढली आहे. सुविधांवर हाेणारा खर्च बघता विश्वस्त मंडळाने सशुल्क पास दर्शनाची सुविधा सुरू केली आहे.