फुटबाॅल क्लब बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेच्या लाेगाेचं अनावरण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालयात झालं. क्रीडा मंत्री गिरीश महाजन आणि एफसी बायर्न क्लबचे सदस्य यावेळी उपस्थित हाेते.
या स्पर्धा 14 वर्षाखालील खेळाडूंसाठी असून 8 फेब्रुवारीपासून सुरूवात हाेणार आहे. या स्पर्धेचं आयाेजन जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर असे असणार आहे. या स्पर्धेतील सर्वाेत्तम कामगिरी करणारे 20 खेळाडूंना म्युनिच (जर्मनी) इथं प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धा 27 फेब्रुवारी ते 4 मार्चपर्यंत पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी इथं हाेतील.
फुटबॉल क्लब बायर्न हा जगातील अग्रगण्य आणि लोकप्रिय फुटबॉल क्लब आहे. आतापर्यंत जर्मन फुटबॉलमध्ये राष्ट्रीय लीगमध्ये 32 वेळा विजेता ठरलेला आहे. तसेच इतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांमध्ये चॅम्पियन्स लीग 06 वेळा, UEFA कप 2 वेळा अशा प्रकारची कारकीर्द आहे.