तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने बदल हाेत आहे. आर्टीफिशीयल इंटेलिजेंसवर जगभरातील वेगवेगळ्या कंपन्या काम करत आहेत. त्यातून आव्हानात्मक संशाेधन पुढे येत आहे. यातून कंपन्यांमधील स्पर्धा देखील वाढली आहे. अमेरिकी टेक कंपनी गुगलने आर्टीफिशीयल इंटेलिजेंसवर आधारीत चॅट साॅफ्टवेअर बार्ड आणलं आहे. नाेव्हेंबर 2022 मध्ये लाॅंच झालेल्या चॅटजीपीटी चॅटबाॅटने संपूर्ण जगाला वेड लावलं. याच्या धाेक्यापासून वाचण्यासाठी चॅटबाॅट सर्व्हिस लाॅंच करण्याचं प्लॅनिंग केलं आहे.
गुगलबार्ड एआय हे गप्पा मारण्याचे चॅटबाॅट आहे. जे LaMDA वर आधारित आहे. म्हणजेच नवा चॅटबाॅट गुगलच्या भाषा माॅडल फाॅर डायलाॅग एप्लिकेशन सिस्टमवर काम करताे. जर याला काेणी काही प्रश्न विचारला तर उत्तर देईल. कंपनी गेल्या काही वर्षांपासून या भाषा माॅडेलवर काम करत आहे.
एका ब्लाॅग पाेस्टमध्ये गुगलचे सीईआे सुंदर पिचाई यांनी बार्ड एआयला टेस्टिंगसाठी तायर केलं आहे. पुढच्या काही आठवड्यात हे जास्तीत जास्त लाेकांपर्यत पाेहचले जाईल. या साॅफ्टवेअरला इंटनरनेटवर असलेल्या महितीला फ्रेश आणि हायक्लालिटी रिस्पॉन्स देण्यासाठी बनवण्यात आल्याचं सागितलं.
चॅटचॅटजीपीटीप्रमाणे बार्डपण त्याच्या बेस भाषा मॉडेलच्या लिमिटेड व्हर्जनवर उत्तर देणार आहे. यामुळे कंप्युटिंग पॉवर कमी होईल आणि जास्तीत जास्त युझर्सपर्यंत हे पोहचू शकेल. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार चॅटजीपीटीला स्टँडअलोन बेसिसवर प्रदान केलं जाईल. याचा अर्थ ही सर्व्हीस एप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस यानी API च्या माध्यमातून मार्केटमध्ये येऊ शकेल.