लाेकसभा आणि राज्यसभेत काॅंग्रेसविरुद्ध भाजप रणकंदन सुरू असताना पुण्यातील कसबा पाेटनिवडणुकीचे वातावरण चांगले तापू लागले आहे. आता या पाेटनिवडणुकीत काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी एन्ट्री केली आहे. काॅंग्रेसचे बंडखाेर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी उमेदवारी मागे घेतली असून, यासाठी राहुल गांधी यांचा फाेन आल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. कसबा निवडणुकीत प्रमुख पक्षांसह तब्बल 29 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गेल्या 40 वर्षांपासून पक्षासाठी काम करत असलेले आणि पक्षाने उमेदवारी डावलल्याने दाभेकर यांनी बंडखाेरीचे निशाण फडकवले हाेते. अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला हाेता. सध्या महाराष्ट्रात काॅंग्रेसचे डाेकेदुखी वाढली असतानाच दाभेकर यांच्या बंडखाेरीने त्यात आणखी भर पडली हाेती. यावर प्रदेश पातळीवर अनेक ताेडगे काढण्यात आले. परंतु पक्षश्रेष्ठी राहुल गांधी यांचा दाभेकर यांना फाेन आला आणि त्यांनी निवडणुकीत माघार घेतल्याचे जाहीर केले. राहुल गांधी यांची कसबा पाेटनिडवणुकीत एन्ट्री ही आगामी काळातील काॅंग्रेसचे निवडणुकीचे प्लॅनिंग सांगणारी आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. कसबा पोटनिवडणुकीत मुख्य लढत ही भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हिंदू महासभेचे आनंद दवे आणि अभिजित बिचुकले हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपने टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी नाकारल्याने कसब्यातील ब्राह्मण समाज नाराज झाल्याची चर्चा आहे.
Trending
- Nagar Urban Bank ः पोलिसांकडून निराशा आणि नाराजी…
- Fraud ः डाॅ. भंडारी आणि डाॅ. गांधींनी केलाय 85 लाखांचा फ्राॅड
- Lok Sabha Election Voter Awareness ः “मै तेरा-१३ मे” रिल्स बनवा स्पर्धा
- Illegal moneylending ः महिलेची अवैध सावकारी, घरच नावावर करून घेतले
- Rahuri News ः चोरांच्या हात की सफाईपासून सावध…
- Pune University Vice Chancellor News ः विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्राधान्य
- Ahmednagar News ः व्यावसायिकाची अशी झाली 98 लाखांची फसवणूक
- Ahmednagar Lok Sabha Election 2024 ः देशातल्या पहिल्या स्वीप केअर व्हाट्सअप क्रमांक संकल्पनेचे कौतुक